कोल्हापूर न्यूज नेटवर्क
या लोकसभा निवडणुकीत कांद्यामुळे आम्हाला थोडा त्रास झाला. कांद्यानं थोड रडवले. तसेच मराठवाडा आणि विदर्भात सोयाबीन आणि कापूस यामुळं देखील थोडा त्रास झाल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. या सर्वांसाठी मी प्रावधान केलं होतं, परंतु आचारसंहिता लागल्यानं त्याचं वाटप करता आलं नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले. शेती पीक किमान आधारभूत किंमत निश्चितीसाठी केंद्रीय कृषी मूल्य आयोगाची बैठक आयोजीत केली होती. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.