शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान : 'गण गण गणात बोते'च्या जयघोषात राजवैभवी थाटात दिंडी पंढरपूरकडे

Kolhapur news
By -

            



          

                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


आषाढी एकादशीनिमित्त बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे आज सकाळी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने काढण्यात येणाऱ्या या दिंडिचे यंदा हे 55 वे वर्षे आहे. जवळपास सातशे वारकऱ्यांसह राज वैभवी थाटात या दिंडीचे प्रस्थान झाले. पुढील महिनाभर पायी प्रवास करुन येत्या 15 जुलै रोजी ही पालखी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पोहोचणार आहे.


श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे वेगळे असे वैशिष्ट्य असते. अत्यंत शिस्तबद्ध पालखीचे रुप डोळ्यात साठवण्यासाठी हजारो भाविक भक्त येतात. या या दिंडीमध्ये 700 वारकरी, 250 पताकाधारी, 250 टाळकरी, 200 सेवेकरी असा मोठा ताफा असतो. श्रींची पालखी पुढील एक महिना पायी प्रवास करून 15 जुलैला पंढरपूर येथे पोहोचेल. पंढरपूर येथील आषाढी उत्सवात सर्व वारकरी सहभागी होतील.