कोल्हापूर न्यूज नेटवर्क
खासदार शाहू छत्रपती महाराजांनी सेनापती कापशी जिल्हा परिषद मतदारसंघातील तमनाकवाडा,हनबरवाडी,बेरडवाडी या गावातील अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली.
यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे यांना नुकसान झालेल्या शेतांची पाहणी करून तत्काळ लेखी अहवाल देण्याची सुचना महाराजांनी दिली.
यावेळी माजी आमदार संजयबाबा घाटगे,धनराज घाटगे,दत्तोपंत वालावलकर,महेश देशपांडे,विनायक घोरपडे,सागर कोंडेकर,मोहन मोरे,सोनुसिंह घाटगे,हिंदुराव शेंदरे आदी आणि भागातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.