आईस्क्रीममध्ये आढळले माणसाच्या हाताचे बोट ; पोलिसांचा तपास सुरू ; कंपनीविरोधात गुन्हा

Kolhapur news
By -

 

      


        



     मुंबई :आईस्क्रीममध्ये माणसाचे हाताचे बोट आढळल्याची धक्कादायक घटना मुंबईत उजेडात आली आहे. पोलिसानी या प्रकरणी यम्मो आईस्क्रीम नामक कंपनीविरोधात गुन्हा दाखल करून सापडलेले बोट न्यायवैद्यक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे.


   यासंबंधीच्या वृत्तानुसार, मालाड येथील ओर्लेम ब्रेन्डन सेराओ नामक डॉक्टरने ऑनलाइन डिलिव्हरी अॅपवरून बटरस्कॉच आईस्क्रीमचे कोन मागवले होते. त्यांनी ते खाण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांच्या तोंडात साधारणतः 2 सेंटिमीटर लांबीचा एक मानवी अवशेष आला. एमबीबीएस डॉक्टर असलेल्या ओर्लेमला हे अवशेष मानवी बोट असल्याचा संशय आला.त्यानंतर त्यांनी तत्काळ मालाड पोलिस ठाणे गाठून यासंबंधीची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ आपला तपास सुरू केला आहे. पोलिस या प्रकरणी ऑनलाईन डिलिव्हरी अॅपसह आईस्क्रीम उत्पादक कंपनीची चौकशी करणार आहेत. यम्मो आईस्क्रीम कंपनीच्या या आईस्क्रीमची फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीही सुरू आहे.