पंतप्रधान मोदींचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सुपूर्द

Kolhapur news
By -

 

        


  नवी दिल्ली  : पंतप्रधान मोदींनी बुधवारी दुपारी दाेन वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. तसेच मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शिफारस केली. मोदी मंत्रिमंडळाची शेवटची बैठक सकाळी  साडेअकरा वाजता झाली. त्यात सरकारने तिसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल धन्यवाद प्रस्ताव मंजूर केला.


१८ व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आले आहेत. भाजपला २४० जागा मिळाल्या, जे बहुमताच्या आकड्यापेक्षा ३२ जागा कमी आहेत. मात्र, एनडीएने २९२ जागांसह बहुमताचा आकडा पार केला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी ८  जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात. याआधी ७ जून रोजी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या सर्व खासदारांची बैठक होणार आहे. जेडीयूचे प्रवक्ते केसी त्यागी यांनी या बैठकीची माहिती दिली आहे.