लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या सुमार कामगिरीची जबाबदारी माझी आहे. त्यानुसार माझी राजीनामा देण्याची तयारी - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Kolhapur news
By -

 

              

      


             कोल्हापूर न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीची  नामुष्की झाली आहे. या  नामुष्कीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  जबाबदारी स्वीकारली  असून आपल्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. 


मंगळवारी जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रात महायुतीने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. राज्यात सत्ताधारी महायुतीला अवघ्या 17 जागांवर समाधान मानावे लागले. तर विरोधी बाकावरील महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या. विशेषतः या निवडणुकीत भाजपने अत्यंत सुमार कामगिरी केली. भाजपला अवघ्या 9 जागा मिळाल्या. यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर सवाल उपस्थित केला जात होता. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्य मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची तयारी दर्शवली आहे.


लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या सुमार कामगिरीची जबाबदारी माझी आहे. त्यानुसार माझी राजीनामा देण्याची तयारी आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी माझा राजीनामा स्वीकारावा व मला पूर्णवेळ विधानसभेसाठी झोकून काम करण्याची संधी द्यावी, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.