कोल्हापूर न्यूज नेटवर्क
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य राखून मुरगूड येथील राणा प्रताप मंडळ व नगरपरिषद यांचे मार्फत बसस्थानकाची स्वच्छता व परिसरात वृक्षारोपण मोहीम राबविली.
या शिवाय उद्याच्या शिवराज्याभिषेक सोहळया च्या निमित्ताने शिवछत्रपती पुतळा व शिवतीर्थ परिसराची सुध्दा स्वच्छता करण्यात आली.
वृक्षारोपण मोहीम राबविण्याचे आवाहन नगरपरिषदेने शाळा,स्थानिक स्वराज्य संस्था व नागरिकांना केले.
त्या प्रमाणे कांहीं मंडळानी जंगल वाढीचे उद्दिष्ट ठेऊन असंख्य बियांची पेरणी केली .
या उपक्रमाचे कौतुक होत आहे.