कोल्हापूर न्यूज नेटवर्क
इंद्रजित देशमुख हे पूर्वाश्रमीचे एक सनदी अधिकारी.
लाल फितीच्या फाईली उघडून सर्व सामान्यांना न्याय देण्याचे काम त्यांनी अखंडपणे केले. माणुसकी हाच धर्म,हीच जात समजून त्यांनी सर्व सामन्यांची कामे केली.
त्यांच्या स्वच्छ आणि स्पष्ट विचारांनी भारावलेला असा एक युवक वर्ग तयार झाला.
समाजासाठी केलेल्या विधायक विचार आणि कामांत एक वेगळाच आनंद असतो हे या युवकांना त्यांच्या सानिध्यात गेल्यावर कळून आले.
त्यांनी मग देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सेवेला सुरुवात केली.यातून शिवम प्रतिष्ठानची सुरुवात झाली.
देशमुख साहेबांनी सरकारी नोकरीचा त्याग केला व शिवम प्रतिष्ठानच्या कार्यासाठी वाहून घेतले.
अनेक खेड्यापाड्यातून शहरातून त्यांच्या विचाराचे आणि कार्याचे लोन पसरत गेले.
मुरगूड येथे शिवगढ नावाचे एक अध्यात्मिक केंद्र आहे.या केंद्रातून शिवमच्या सामाजिक सेवेच्या कामाची मुरगूड व आसपासच्या खेड्यांत सुरुवात झाली.
याच केंद्रात शिवम प्रतिष्ठान मार्फत दरवर्षी उन्हाळी सुट्टीत लहान मुलामुलींसाठी संस्कार शिबिर आयोजित करण्यात येते.आठवडाभराच्या या शिबिरात मुलांना प्रामुख्याने स्वतःच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या,आई वडील आणि ज्येष्ठांच्या प्रति आदर भाव,आज्ञाधारक पणा,स्वावलंबन ,समाज व राष्ट्रप्रेम वृध्दींगत करण्यासाठी स्फूर्ती गीते ,व्यक्तिमत्त्व विकासाकरिता उत्तम ग्रंथाचे वाचन,श्लोक पठण,सांस्कृतिक व क्रीडा विषयक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.गुणीजनांचा सत्कार केला जातो.
एकंदरीत जे जे उदात्त उन्नत ते ते शिव प्रतिष्ठान मार्फत शिकवले जाते.करवून घेतले जाते.
माणुसकी हाच खरा धर्म मानून जे जे दुःखी कष्टी असतील ,आर्थिक परिस्थितीने गांजलेले असतील ,अत्याचाराला बळी पडलेले असतील त्या सर्वाँना मदत करण्याचे,आधार देण्याचे काम शिवम प्रतिष्ठान मार्फत केले जाते.
या कामांची यादी करावी तेवढी थोडीच.
निर्वासितांना घरे बांधून देणे.थंडीत कुडकडणाऱ्यांना ब्लँकेट पुरविणे ,पूरग्रस्तांना आर्थिक मदत करणे.विस्थापितांना आसरा देणे.गड किल्ल्यांची स्वच्छता करणे .
राष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जोपासणासाठी जे जे करता येईल ते विधायक काम करणे.
अशा अनेक कामातून जो आनंद मिळतो तो अनन्य साधारण असतो.
अनेक सुख साधने असूनही मानसिक आनंद मिळत नाही.
लाखो रुपयांचा बिछाना असूनही झोप येत नाही सुग्रास भोजन समोर असूनही भूक लागत नाही ,टिव्ही,मोबाईल, पंखा,गिझर,सर्व कांहीं असूनही शारीरिक स्वास्थ्य मिळत नाही अशा सर्वाँना शिवम प्रतिष्ठान च्या माध्यमातून मनःशांती आणि विधायकतेचा आनंद मिळतो.
शिव प्रतिष्ठानला पंचवीस वर्षे पूर्ण होतात.
या निमित्त प्रतिष्ठानने एक विधायक काम हाती घेतले आहे.
जेथे जेथे स्मशान भूमि असेल तेथे जाऊन त्याची स्वच्छता करणे.तिथल्या असुविधा दूर करणे,ग्रामपंचायती,नगर पलिकांचेही सहकार्य घेणे,नागरिकांना स्वच्छतेविषयी प्रबोधन करणे,वैद्यकीय सेवा मिळवून देणे अशी विविध सामाजिक कामे प्रतिष्ठान या रौप्यमहोत्सव सोहळ्यानिमित्त हाती घेत आहे.
शिवम प्रतिष्ठानचे एक सुंदर तत्व आहे.
जीव सेवा हीच ईश्वर सेवा होय.
स्वामी विवेकानंदांचे हे तत्त्वज्ञान प्रतिष्ठानच्या युवकांनी अंगी बानले आहे.
ईश्वर पहाता येत नाही .तो अनुभवता मात्र येतो.
दुसऱ्यावर अन्याय करून स्वतःची तुंबडी भरणाऱ्या ना सुध्दा तो शासन करतो.
त्याच्या काठीला आवाज नसतो.
युवकांच्या मना मनात हे विचार पेरत जाणे हे तितके सोपे काम नाही.
शिवम सारख्या संस्था देशभर जागो जागी निर्माण व्हाव्यात हीच इच्छा.
३० जून या प्रतिष्ठानच्या पंचविसावा वर्धापन दिनी शिवमच्या स्वयंसेवकांनी मुरगूड मधील स्मशान भूमीची स्वच्छता केली.रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्यात सुध्दा मदत केली.
सहभागी स्वयंसेवकांची नावे याप्रमाणे :-
डॉ.साठे,डॉ.अंकुश पाटील, सोमनाथ यरनाळकर ,सर्जेराव भाट,संदेश म्हेतर,संदीप चांदेकर,सागर सापळे,नंदकिशोर खराडे,धोंडीराम परीट,रणजित चौगुले,संग्राम सोरप.



