माजी आमदार के पी पाटील महाविकास आघाडीच्या वाटेवर ?

Kolhapur news
By -

            
              


               कोल्हापूर न्यूज नेटवर्क


   राधानगरी भुदरगडचे  माजी आमदार के. पी. पाटील हे अजितदादांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मोठे नेते मानले जातात. पण ते महाविकास आघाडीच्या वाटेवर  असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे . कारण राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर हे आमदार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनाच पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे, हे निश्चित आहे. अशावेळी आपल्याला आमदारकी लढवायची असेल तर आपल्याला महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही, हे  के.पी. पाटील यांच्य लक्षात आल्याने व दोन दिवसांपूर्वीच मविआने कोल्हापूर मध्ये काढलेल्या मोर्चामध्ये ही त्यांनी सरकारवर कडाडून टीका केल्यामुळे तसेच शाहू महाराज यांच्या आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमात राधानगरी-भुदरगड मध्ये के.पी. पाटील यांनी शाहू महाराजांचे स्वागत केल्याने के.पी. पाटील यांची मविआच्या दिशेने वाटचाल सुरु झाल्याचे मानले जात आहे . 

 आधीच लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अपेक्षीत यश मिळालेले नाही. त्यात संघाच्या वतीनेही अजित पवार यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात आता अजित पवारांचे शिलेदार त्यांना सोडून जात आहेत का? असा ही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय.