सामाजिक वनीकरण मार्फत शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वृक्ष रोपे ; मुरगूड ,बस्तवडे येथे स्टॉल

Kolhapur news
By -

            


                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क

  

       सामाजिक वनीकरण विभागामार्फत शेतकऱ्यांना अगदी सवलतीच्या दरात वृक्ष रोपे पुरवण्यात येणार आहेत.

    सामाजिक वनीकरण च्या वनक्षेत्रपाल (कागल विभाग) सोनल केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुरगूड येथे नगरपरिषदे समोर शिवतीर्थ परिसरात  सवलतीच्या दरातील वृक्ष रोपांचा स्टॉल २७ जून रोजी लावण्यात आला आहे. हा स्टॉल बाजार दिवशी सुध्दा लावण्यात येईल असे या विभागाच्या हमीदवाडा परिमंडळ वनाधिकारी सौ.प्रतिभा पाटील यांनी सांगितले.

    ही वृक्ष रोपे सहा ते सात महिन्यांची असून खाजगी नर्सरीत त्यांची किंमत दीडपट ते दुप्पट आहे.

    या रोपांमध्ये....आवळा,महोगणी,कांचन,जांभूळ,काजू,फणस अशा मोठाल्या उपयुक्त वृक्षांचा समावेश आहे. ही राेपे  १८ ते  १९ महिन्यांची आहेत. 

    शाळा व स्थानिक स्वराज संस्थानी ((ग्राम पंचायत ,नगरपालिका  ई.) अर्जाद्वारे लेखी मागणी केल्यास एका वेळी ३०० पर्यंत रोपे अत्यल्प किंवा मोफत पुरविण्याची वनीकरण ची योजना आहे असे ही सांगण्यात आले.

    वनसेवक धोंडीराम मांडरेकर,कर्मचारी राजाराम एकशिंगे,विनोद पाटील ,कृष्णात चीखलकर,यांनी रोप विक्री स्टॉल मध्ये सहभाग नोंदवला.

   या  सामाजिक उपक्रमास मुरगूड नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप घार्गे,रणजित निंबाळकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.