पुरी, ओडिशातील जगन्नाथ मंदिराचा खजिना रविवारी दुपारी दीड वाजता उघडण्यात आला. ओडिशाच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या माहितीनुसार यावेळी शासकीय प्रतिनिधी, एएसआय अधिकारी, श्री गजपती महाराजांचे प्रतिनिधी यांच्यासह ११ लोक भांडारगृहात उपस्थित होते.
यापूर्वी मंदिराचा खजिना अधिकृतपणे ४६ वर्षांपूर्वी १९९७८ मध्ये उघडण्यात आला होता. तिजोरी उघडण्यापूर्वी प्रशासनाने सहा जड लाकडी पेट्या मागवल्या आहेत. त्या उचलण्यासाठी ८ ते १० जण लागले. हे रत्न भांडारात पाठवण्यात आले आहेत.
सरकार रत्न भांडारमध्ये असलेल्या मौल्यवान वस्तूंची डिजिटल यादी करेल, ज्यामध्ये त्यांचे वजन आणि निर्मिती यासारखे तपशील असतील.
एसपी बेशुध्द
रत्न भांडारचा दुसरा दरवाजा उघडताच SP पिनाक मिश्रा बेशुद्ध झाले. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. मात्र, ते बेशुद्ध होण्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
---------------------------------------------------
ओडिशातील पुरीचे जगन्नाथ मंदिर जगभर प्रसिद्ध आहे. मंदिराच्या गर्भगृहात भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती आहेत, ज्या दर 12 वर्षांनी बदलल्या जातात. मंदिरातील मूर्ती बदलल्यावर त्या मूर्तींमधून ब्रह्म द्रव्य काढून नवीन मूर्तींमध्ये लावले जाते.

