कोल्हापूर न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र सरकारच्या वतीने आता राज्यातील जनतेला देवदर्शन घडविले जाणार आहे. पात्र व्यक्तीच्या प्रवासाचा, राहण्याचा आणि भोजनाचा खर्च सरकार करणार आहे. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर परराज्यातील तीर्थस्थळांना देखील लोकांना जाता येणार आहे. या योजनेची घोषणा मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी केली होती, त्या योनजेचा शासन आदेश रविवारी दि. 14 रोजी काढण्यात आला असून यात काही नियम अटी घालण्यात आलेल्या आहेत, तर या योजनेचा लाभ कोणाला व कसा घेता येणार याविषयी सर्व माहिती देण्यात आलेली आहे.
योजनेसाठी कोण पात्र असणार ...
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 60 वर्षाहून अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असणार आहे.
• निर्धारित तीर्थस्थळापैकी एका तीर्थस्थळाला भेट देण्याचा यात्रेकरूंना अधिकार असेल.
• प्रवास खर्चाची प्रतिव्यक्ती मर्यादा 30 हजार कमाल आहे. यामध्ये भोजन निवास इत्यादी बाबींचा समावेश आहे.
• लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसले पाहिजे.
• या कुटुंबातील सदस्य आमदार किंवा खासदार नसावे, अन्यथा लाभ मिळणार नाही.
• ट्रॅक्टर वगळून इतर चारचाकी वाहन असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही
पंढरपूरसह ६६ मंदिरांचे दर्शन
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत राज्यातील एकूण ६६ तीर्थक्षेत्राचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये सिद्धविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, चैत्यभूमी, माऊंट मेरी चर्च, मुंबादेवी, वाळकेश्वर मंदिर, गोराई येथील विश्व विपश्यना पॅगोडा, शिर्डीचे साई मंदिर, पंढरपूरसह राज्यातील अनेक मोठ्या स्थळांचा समावेश आहे.

