शिल्पकार एम डी रावण यांना शोकसभेत श्रध्दांजली.

Kolhapur news
By -

 

          


               कोल्हापूर न्यूज नेटवर्क


     शिल्पकार एम डी रावण यांना मुरगूड येथील शोकसभेत श्रध्दांजली वाहण्यात आली.

    एम डी नी आपल्या जीवन पर्वात अनेक कल्पक उपक्रम सुरू केले होते.राष्ट्रीय पातळीवरील व्हॉलीबॉल सामने,जो जे वांछील तो या ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानातील उक्ती वर आधारित सर्व कलागुणांचा एकत्रित मेळावा,शिवाजी महाराज,संभाजी महाराज,आणि देव देवतांची शिल्पे ,इत्यादी उपक्रमांचे गुणगान शोकसभेत विविध  वक्त्यांनी केले.

    नगरपरिषदेच्या ज्येष्ठ नागरिक सभागृहात ही सभा संपन्न झाली.

    एस के पाटील, आकुर्डे,डी डी चौगुले ,प्रा.चंद्रकांत जाधव,अविनाश चौगुले,शीतल देसाई,बाळासाहेब कांबळे आकुर्डे,आनंदा,गोधडे, राजु चव्हाण,शोभा घाटगे,विष्णुपंत खैरे,सखाराम सावर्डेकर,सुभाष माने,चंद्रकांत माळवदे,महादेव वागवेकर,एम आर हळदकर,शिवाजी रावण जयवंत हावळ,सिकंदर जमादार,धोंडीराम परीट,प्रवीण दाभोळे इत्यादी मान्यवरांनी आपल्या मनोवेदना व विचार व्यक्त केले.