कोल्हापूर न्यूज नेटवर्क
वाराणसी मधील 'नमामी गंगे' या अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या अभिनव उपक्रमाचे पडसाद देशभर उमटू लागल्यास नवल नाही.
नदी ही नुसती जलवाहिनी नाही . ती जीवनवाहिनी सुध्दा आहे.
ती नवीन सुध्दा नाही, तर हजारो वर्षे जन जीवनाशी जोडलेली नाळ च म्हणा ना !
वेदगंगेच्या काठावर तिच्या उगमाजवळ हजारो वर्षापूर्वी ऋषीमुनींनी वेद पठण केले होते आणि म्हणूनच तिचे नाव वेदगंगा असे पडले आहे .
असा पवित्र पौराणिक वारसा लाभलेली ही नदी चार पाच तालुक्यांचा उध्दार करत हजारो वर्षे वहात आहे.
कोरडी पडायची तेंव्हा कुदळी चे घाव सोसून खड्ड्यांनी भरलेल्या पा त्रातले पाणी द्यायची.आज ती बारा महिने भरून वहाते .
जणू गंगेचं हे दुसरं रूपच.
तिच्या सारखीच वेदगंगेची भक्तिभावाने महाआरती करायचे असे मुरगूड व परिसरातील हिंदुत्ववादी संघटनांनी ठरवले.कल्पना खुपचं सुदंर होती म्हणून येथील तमाम शिवभक्तांनी सुध्दा उत्तम साथ दिली.
पहिली महाआरती वाघापूर वेशीला दत्तमंदिराजवळ करण्यात आली.नदीला दोनदा पूर आला पण तिनं कोणाचं नुकसान केलं नाही.
तिकडे पंढरपुरात आषाढी वारीच्या टाळ मृदुंगाचे आवाज मेघांना साद घालत होते आणि इकडे वेदगंगेच्या काठावर महाआरतीचे बोल जणू लाटांशी फुगडी घालत होते.
ते एक विलोभनीय दृश्य होते.गंगामाई प्रसन्न न झाली तरच नवल.
हिंदुत्ववादी संघटनांचा हा उपक्रम कृतज्ञ भावाने भारलेला होता त्यामुळे शहरभर त्यांचे कौतुकही झाले.
महाआरतीत सहभागी झालेले भक्तगण याप्रमाणे :
जलपूजनाचे पौरोहित्य अनुबोध गाडगीळ,सर्जेराव भाट,ओंकार पोतदार,जगदीश गुरव,प्रकाश पारिष्वाड,संकेत शहा,विक्रम घाटगे,विठ्ठल कुंभार,इत्यादी .


