कोल्हापूर न्यूज नेटवर्क
येथील शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट, श्रीकृष्णनगरी मुरगुड येथे रविवार दिनांक २१ जुलै २०२४ रोजी गुरुपौर्णिमा उत्सव स्वर्गीय राजे विक्रम सिंह जी घाटगे सभागृहात मोठ्या थाटात संपन्न झाला. प्रमुख पाहुण्या म्हणून अमरावती येथील श्रद्धेय मंदाताई गधे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथ प्रकाशनाने झाली. शिवगड येथून प्रकाशित होणारे त्रेंमशिक भक्ती योग च्या गुरुपौर्णिमा अंकाचे तसेच श्रीमद् भगवद्गीता भावदर्शन खंड पहिला आणि आनंद सागर काव्य निरुपण अशा तीन ग्रंथांचे प्रकाशन श्रीमंत सुहासिनीदेवी वि. घाटगे वहिनीसाहेब, प्रा. बाळकृष्ण चौगुले सर, सौ. स्नेहाताई महाजन ,बाळासाहेब सुर्यवंशी आणि श्रद्धेय मंदाताई गंधे यांचे हस्ते झाले.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रवचनकार प.पू.डॉ. श्रीकृष्ण देशमुख यांचे गुरुपुजन महाराष्ट्रातील तीन विभागाचे प्रतिनिधी श्री श्री सुहास लिमये कोल्हापूर, श्री मोहन भट यवतमाळ आणि श्री.श्रीनिवास कुलकर्णी मुंबई यांचे हस्ते झाले पौरोहित्य श्री अनुबोध गाडगीळ यांनी केले.
अमेरिकास्थित श्री. मंगेश फडके यांनी आपल्या मनोगतामध्ये अमेरिकेमध्ये प. पू.डॉ. काका यांच्या वेदांत प्रचार आणि प्रसारा करिता' वेदान्त भास्कर' ही अधिकृत नोंदणीकृत संस्था स्थापन केल्याचे सांगितले. त्यासंबंधीची चित्रफिती ही त्यांनी सभागृहात दाखवली. चित्रफिती मध्ये स्वामी गोविंददेव गीरी यांचे उद्घाटन पर भाषण सादर केले. त्यांनी आपल्या भाषणात मानवी जीवनाच्या उद्धाराकरिता विविध धर्म आणि तत्त्वज्ञाने ( दर्शने) कार्यरत आहेत. त्या सर्वांचा आदर करत त्यामधील सर्वोच्च तत्त्वज्ञानाची उंची गाठलेले वेदांत शास्त्र आहे आणि ते आता जगन्मान्य झाले आहे. असे सांगितले. ज्या दिवशी अमेरिकेमध्ये वेदांत भास्कर ही संस्था स्थापन होत आहे त्या दिवशी दोन योग आहेत एक डॉ. श्रीकृष्ण देशमुख, मुरगूड यांचा वाढदिवस (ज्यांच्या प्रेरणेने आणि तत्त्वज्ञानाने )ही संस्था सुरू होत आहे आणि आणि स्वामी विवेकानंदांचा निर्वाणदिन म्हणजे एका महामानवाचे निर्वाण आणि दुसऱ्या महामानवाचा उदय हे विशेष आहे.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रद्धेय मंदाताई गंधे यांनी आपल्या मनोगतात डॉ.काका यांचे कार्याचा आढावा घेतला. आपण सर्वांनी त्यांचा वेदांताचा विचार प्रामाणिकपणे अखंड राबवत राहूया असा संदेश त्यांनी दिला.
त्यानंतर डॉ. श्रीकृष्ण देशमुख तथा डॉ. काका यांचे 91 व्या वयात पदार्पण केल्याबद्दल औक्षण करण्यात आले. दासबोधातील सद्गुरु स्तवन हा समास श्री.प्रसाद जोशी आणि सौ. सोनाली केळकर यांनी सादर केला. याच दरम्यान डॉ.काका यांनी पुढील वेदांत प्रसार कार्या करिता नियोजित केलेले १२ आचार्य यांचा गौरव करण्यात आला.
आपल्या आशीर्वाद प्रवचनामध्ये डॉ.काका यांनी उपस्थित सर्वांना मानवी जीवनाचे सार्थक करून घ्या. परमानंद प्राप्ती करून घ्यावी त्या करीता भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास आणि त्याप्रमाणे साधना, उपासना करून जीवनाचे सार्थक करून घ्यावे असे प्रतिपादन केले.
शिवगड या संस्थेचा उपयोग आपल्या आध्यात्मिक उन्नत्ती करिता सर्वांनी करून घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सौ संपदा वनारसे नाझरे हिने पसायदान सादर केले. कार्यक्रमाला महाराष्ट्रातून आणि मुरगूड परिसरातून मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता श्री सम्राट भोपळे, श्री श्रीरंग पाटील, श्री विनायक भोसले, श्री सुहास घाटगे, श्री शरद परीट, श्री अमोल भारमल, श्री. स्वप्निल पाटील, शुभम मगदुम,संदीप पाटील,श्री.प्रकाश एकल,श्री.जगदीश आस्वले श्री. भरत मुसळेसौ नीलिमा लिमये,डॉ. पोंक्षे श्री आबदार माऊली, सुहास कोंडेकर इत्यादींचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन प्रा. विनय कुलकर्णी सर यांनी केले.



