कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड मधील नगरपरिषदेचे खुले नाट्यगृह गाड्या लावण्याची जागा बनले आहे आहे तक्रार येथील जागरूक नागरिकांनी एका निवेदना द्वारे केली आहे.
या निवेदनात आणखी काही गैरसोयी मांडण्यात आल्या आहेत.
तुकाराम चौकात सुध्दा पार्किंग होत असते.
ही दोन्ही स्थळे सार्वजनिक असून नगरपरिषदेने त्यांच्या स्वच्छतेकडे व सन्माना कडे लक्ष दिले पाहिजे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पाऊस चांगला झाला असून तलाव भरला आहे.गुरुवारचा ड्राय डे रद्द करून नागरिकांना पुरेसे व स्वच्छ पाणी प्यायला मिळावे अशी मागणी सुध्दा निवेदनातून केली आहे.
या वेळी माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके ,माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी ,सर्जेराव भाट,ओंकार पोतदार,विक्रांत भोपळे,पृथ्वी चव्हाण ,सुभाष अना वकार,रणजित मोरबाळे,निशांत जाधव,संकेत शहा,इत्यादी नागरिकांचा समावेश होता.

