सर पिराजी तलाव खुश हुआ ;ओढ्याच्या जोरदार प्रवाहाने पाणी पातळी वाढू लागली.

Kolhapur news
By -

 

          


                कोल्हापूर न्यूज नेटवर्क


   मुरगूड चा सर पिराजी तलाव पाण्याच्या जोरदार प्रवाहाची वाट पहात होता. जुलै मध्ये पावसाचा जोर असतो .ऑगस्टला तो ओसरत असतो .त्यामुळे याच महिन्यात तो भरला पाहिजे अशी सर्वांची अपेक्षा असते.

    तलवाची पाणी साठवण ३७ फूट ३ इंच इतकी आहे.काल पर्यंत ती २१ फूट २  इंचा पर्यंत आली होती.अजून.निम्मा तलाव भरायला हवा.

    तलावाला येऊन मिळणाऱ्या बागीच्या ओढ्याचा जोरदार प्रवाह पाहून जणू 

 सर पिराजी तलाव खुश हूआ असेच म्हणावे लागेल.

  त्याच्या खुशीचे आणखी एक कारण म्हणजे स्वच्छता स्वयंसेवकांनी तलाव काठा ची घाण काढली .तलावाला येऊन मिळणाऱ्या बागी च्या ओढ्यातील आणि दौलत वाडी जवळच्या नव्या पूला खालून येणारा ओढा यातील सर्व अडथळे दूर केले आणि घाण न  करण्याचे आवाहन देखील नागरिकांना केले.

    नवरदेवाला नटवून बोहल्यावर उभा केला की त्याच्या चेहेऱ्यावरचे आनंदाचे भाव टीपावेत तसे जणू या तलावाला वाटले असावे.

   या साठी कुणीतरी पुढाकार सुध्दा घ्यावा लागतो.शिवतीर्थावर सतत सेवा देणाऱ्या शिवभक्त सर्जेराव भाट या युवकाचे कौतुक केले पाहिजे.इतरही कांहीं स्वेयं सेवक मग जमा होतात.कोणी नाही आले तर एकट्यानेच सुरुवात होते.

  सोमनाथ,जगदीश,ओंकार  असे एकेक जमा होऊ लागतात. यातही हे युवक आनंद शोधत असतात.सायलेंसर काढून मोटारसायकल उडवून नागरिकांना त्रास देण्यात कसला आलाय आनंद.तो फक्त उन्माद असतो.

 वारकऱ्यांना पंढरीच्या दिंडीत जो आनंद मिळतो तो या युवकांना स्वच्छता आणि समाज सेवेत मिळतो. नगरपरिषद व पोलिस ठाणे यांचेही या युवकांना चांगले सहकार्य मिळते.

     पूर परिस्थिती जशी हाताळली तशी सर पिराजी ची पण काळजी घेतली.

  सर पिराजी तलाव खुश हुवा.