कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कै. रावसाहेब दादा पाटील हे अखेरपर्यंत गांधीवादी विचारसरणीचे होते. त्यांनी शेतकरी, कष्टकरी, बहुजन समाजातील सर्वसामान्य लोकांना अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक कुटुंबाला उभे केले. सामान्य माणसाला स्वाभिमानाने जगता आले पाहिजे याचा पाठपुरावा त्यांनी आयुष्यभर केला .त्यांचे सर्व धर्मीयांबद्दल सलोख्याचे संबंध होते. सहकार क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना शासनाचा सहकार महर्षी हा पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे त्यांच्या निधनाने सीमा भागातील एक आधारस्तंभ हरपल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यांच्या विचारांचा वारसा आपण पुढे घेऊन जाऊया. अशाप्रकारे त्यांना विविध मान्यवरांच्या कडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी डॉ अच्युत माने सर, प्रा. एन आय खोत, प्रकाश शहा, जयराम मिरजकर, प्रशांत गुंडे, दीपक इंगवले, प्रसन्नकुमार गुजर, प्रा.आनंद संकपाळ, प्रा. सचिन खोत,विठ्ठल वाघमोडे, सुधाकर माने, अस्लम शिकलगार इ. मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी प्रा. अजित सगरे यांनी वाहिलेल्या श्रद्धांजली वाचन व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा नविजन कांबळे यांनी केले.
प्रा.नानासाहेब जामदार, तुकाराम कोळी सर, कबीर वराळे सर, अशोक तेली, आय्याज पठाण, सौ. साजिदा पठाण,सौ. मेथे, महेंद्र सांगावकर, खडेद अण्णा, सुभाष जोंधळे, बाबासाहेब मगदूम, डॉ. कुंभार, , प्रमोद निर्मळे, सर्जेराव हेगडे, सिद्धार्थ कांबळे, देसाई शिरगुपी, अशोक खांडेकर, अजित पवार, इत्यादी मान्यवरांसह अनेक जण उपस्थित होते.

