खाजगी शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षक यांना दहा वीस तीस वर्षाची आश्वासित प्रगती योजना लागू करा : राज्याध्यक्ष भरत रसाळे यांची शासनाकडे मागणी

Kolhapur news
By -

 

                  


                  कोल्हापूर न्यूज नेटवर्क


१४ मार्च  २०२४ रोजीच्या शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार सातव्या वेतन आयोगात प्रस्तावित केलेली दहा' ,वीस व तीस वर्षाच्या सेवेनंतरची आश्वासित प्रगती योजना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू केलेली आहे .तथापि मान्यता प्राप्त शाळा मध्ये  मोठ्या संख्येने असलेल्या लाखो मुख्याध्यापक व शिक्षक यांना ही योजना अद्यापही लागू केलेली नाही .त्यांना ही आश्वासित प्रगती योजना तात्काळ लागू करावी अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य खा प्राथ शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी शिक्षण मंत्री व शिक्षण सचिव यांचेकडे केली . याबाबतचे निवेदन त्यांना देणेसाठी कोल्हापुर विभागाचे शिक्षण उपसंचालक  महेश चोथे साहेब यांच्याकडे दिले . 


या निवेदनामध्ये म्हटलेल आहे की , सातव्या वेतन आयोगातील बक्षी समितीच्या खंड दोन मधील शिफारशीनुसार प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील  शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना  दहा ,वीस व तीस वर्षाच्या सेवेनंतरची आश्वासित प्रगती योजना दि . १४ मार्च २०२४ च्या शासन आदेशाने  लागू कलेली आहे . पण  मोठ्या संख्येने असलेल्या मुख्याध्यापक व शिक्षक यांना ही आश्वासित प्रगती योजना अद्यापही लागू केलेली नाही शासनाकडून फक्त आश्वासनाचे गाजर दाखवले जात आहे ही बाब या घटकावर अन्याय करणारी आहे .म्हणून या अधिवेशनामध्ये मुख्याध्यापक व शिक्षक यांना ही आश्वासित प्रगती योजना लागू करण्याच्या निर्णय जाहीर करावा अशा प्रकारची मागणी या निवेदनामध्ये करण्यात आलेली आहे .

 शिक्षण उपसंचालक  महेश चोथे यांनी तात्काळ हे निवेदन शासनाकडे पाठवून कार्यवाई करण्याचे आश्वासन समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांना दिले आहे .त्यांबद्धल त्यांनी  शिक्षण उपसंचालक यांचे आभार मानले.