विशाळगडावरचे अतिक्रमण प्रशासनाने हटवले ; मुरगूड मध्ये शिवभक्तांनी मध्ये पेढे वाटले.

Kolhapur news
By -

 


           


                कोल्हापूर न्यूज नेटवर्क


 प्रशासनाने विशाळगडावरचे अतिक्रमण हटवले .मुरगूड मध्ये शिवभक्तांनी रस्त्यावर उभे राहून येणाऱ्या जाणाऱ्यांना पेढे वाटले.

  गडकिल्ले ही स्वराज्याची अमानत आहे. ती जपली गेली पाहिजे.

  विशाळगडाला तर ऐतिहासिक दृष्ट्या अनन्य साधारण महत्व आहे. पन्हाळ्यावर सिद्दी जौहर च्या वेढ्यात राजे अडकले होते.तेथून ते ऐन पावसात निसटले.शिवा काशिद राजासाठी बलिदान दिले.

  घोडखिंडीत बाजी प्रभूंनी  राजांचा पाठलाग करणाऱ्या मोगल सैन्याला अडविले.राजे गडावर पोचले.इकडे बाजी प्रभूंनी प्राण सोडले.

    याशिवाय बांदल सेनेच्या शूर सैनिकांनी गडाच्या पायथ्याशी शत्रूशी लढताना आपले रक्त सांडले.

      इतका जाज्वल्य वारसा लाभलेल्या विशाळगडावर अनधिकृत अतिक्रमण करून  गडाचे पावित्र्य  धोक्यात आणले .

     ती दूर करावीत म्हणून मुरगूड मधील शिवभक्तांनी पोलिस ठाण्यात निवेदन दिले होते.

     ती अतिक्रमणे प्रशासनाने हटवली व गडाचे पावित्र्य राखले म्हणून येथील शिवभक्तांनी शिवरायांना अभिवादन केले व रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना पेढे वाटून आनंद साजरा केला.

    पुढील शिवभक्तांनी आपला सहभाग नोंदविला.

  रणजित मोरबाळे,सुभाष अनावकर,अजित कोळी ,सर्जेराव भाट,पृथ्वी भुते, संकेत शहा,युवराज सुर्यवंशी,ओंकार पोतदार,सुशांत मांगोरे,अजित मेंडके,मयूर सावर्डेकर,सागर गुजर,अजित खतकर,दत्तात्रय साळोखे,बजरंग सोनुले,आणि इतर अनेक.