कोल्हापूर न्यूज नेटवर्क
सामान्य नागरिकांचे तक्रार ऐकून त्यांना न्याय देण्याकरिता निपाणीत दि. २६ जून रोजी जनस्पंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या वेळेस 4 JR ह्युमन राईट्स केअर आँरगेनायझेशन कडून ८
देण्यात आल्या होत्या , पण या तक्रारी देऊन जवळपास २ महिने उलटून देखील त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही . म्हणून 4 JR ह्युमन राईटस् केअर आँरगेनायझेशन कडून २१ जुलै २०२४ रोजी मुख्यमंत्री , जिल्हाधिकारी , रिजनल कमिशनर यांना पत्र पाठवून ज्या अधिकाऱ्यांनी या लेखी तक्रारीवर कार्यवारी कार्यवाही न करून शासकीय कामात हलगर्जीपणा केला आहे त्यांच्यावर कारवाई करण्या संदर्भात पत्र पाठविले आहे. यावरही कारवाई न केल्यास संघटनेच्या वतीने कायदेशीर लढा देण्यात येणार असल्याचे संघटना पदाधिकाऱ्यांच्याकडून सांगण्यात आले आहे .

