केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुन:उभाणीसाठी शाहू ग्रुपकडून १० लाखाच्या मदतीची समरजीत घाटगे यांच्याकडून घोषणा

Kolhapur news
By -

 

        


              कोल्हापूर न्यूज नेटवर्क

   

      छत्रपती शाहू महाराज  यांच्या संकल्पनेतून उभारलेली आणि  त्यांचे बंधू श्रीमंत पिराजिराव उर्फ बापूसाहेब महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली,बांधलेली संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची ऐतिहासिक वास्तू  आगीत जळून खाक झाली. छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून मराठी नाट्यगृहांचा मानबिंदू असणाऱ्या या वास्तूच्या पुन:उभाणीसाठी छत्रपती शाहू ग्रुप मार्फत दहा लाख रुपयांची मदत शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी आज तातडीने जाहीर केली .


केशवराव भोसले नाट्यगृह हा कोल्हापूरचा अनमोल सांस्कृतिक ठेवा आहे. त्यामुळे या नाट्यगृहला लागूनच असलेले शाहू खासबाग मैदान पूर्वीप्रमाणेच दिमाखात उभा राहण्यासाठी छोट्या-मोठ्या संस्था, मंडळे ,सेवाभावी संस्था, व्यक्ती यांनी आर्थिक मदतीचे हात पुढे करावेत.असे आवाहनही राजे समरजितसिंह  घाटगे  यांनी केले आहे.