शिवाजी महाराज पुतळा कोसळल्या प्रकरणी बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील पोलिसांच्या ताब्यात

Kolhapur news
By -

 

         


                कोल्हापूर न्यूज नेटवर्क


      सिंधुदुर्गमधील पुतळ्याप्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टन्ट आरोपी चेतन पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात आलेला. त्यानंतर चेतन पाटीलच्या कोल्हापुरातील शिवाजी पेठ येथील घरी जात पोलिसांनी चौकशी देखील केली होती. अशातच आता चेतन पाटीलला कोल्हापूर पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे.


चेतन पाटील याला आता मालवण पोलीस ठाण्यात आणले जाणार असून त्याची कसून चौकशी केली जाईल. या चौकशीतून शिवाजी महाराजांच्या मूर्तीविषयी आणखी कोणती नवी माहिती समोर येणार, हे पाहावे लागेल. चेतन पाटील हा स्ट्रक्चरल कन्सल्टंट असून त्याच्या दाव्यानुसार मूर्तीसाठी जे फाऊंडेशन (चबुतरा) उभारला होता, त्याचे डिझाईन त्याने नौदलाला तयार करुन देण्यात आले होते. यापलीकडे त्याला नौदलाकडून कोणतीही वर्क ऑर्डर किंवा पत्र प्राप्त झाले नसल्याचे चेतन पाटील याने अगोदरच स्पष्ट केले होते.