निपाणी नगराध्यक्षपदी सोनल कोठडीया तर उपनगराध्यक्षपदी संतोष सांगावकर यांची निवड

Kolhapur news
By -

         


           


 


                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


      निपाणी नगरपालिकेवर  मा .खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांना भाजपची सत्ता अबाधित राखण्यात यश  मिळाले आहे. नगराध्यक्षपदी भाजपाच्या नगरसेविका सोनल राजेश कोठडीया यांची तर उपनगराध्यक्षपदी संतोष हिंदुराव सांगावकर यांची निवड झाली. यामध्ये कोठडीया व सांगावकर यांना १७ तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार अनिता दिलीप पठाडे व उपनगराध्यक्ष पदाचे  सर्फराज बडेघर यांना १४ मते मिळाली.काँग्रेसच्या दोन आणि अपक्ष एक नगरसेवकांच्या सहकार्याने भाजपाने सत्ता अबाधित ठेवली आहे.