कोल्हापूर न्यूज नेटवर्क
डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्या मंदिर चिखली येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त वृक्षमित्र,आजी माजी सैनिक समाजसेवी असोसिएशनचे संघटक व डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्या मंदिर चिखली बचाव समितीचे अध्यक्ष महादेव इराप्पा कांबळे (माजी सैनिक) यांचे कडून शाळेच्या प्रथम शिक्षिका शैलेजा चिखलीकर, पूनम औंधकर , अमृता कुंभार, शितल कांबळे, सरिता कांबळे व मुलांना आईचं प्रेम देऊन जेवण बनवणा-या संगिता गोंधळी तसेच अंगणवाडी शिक्षिका लता कांबळे यांना माहेरचा आहेर म्हणून साड्या देण्यात आल्या .
यावेळी डॉ अजय चिखलीकर, प्रा.गजानन कांबळे , मुख्याध्यापक विवेक गवळी उपस्थित होते. तसेच १२तास व महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित परिक्षा मध्ये भाग घेणा-या विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्रशस्तिपत्र व शालेय वस्तू तसेच नंबर १, २, ३ काढून बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
--------------------------------------

