कोल्हापूर न्यूज नेटवर्क
नानीबाई चिखली येथील पंचशील नगर मध्ये मंगळवार दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 8.00 वा. महादेव कांबळे माजी सैनिक वृक्ष मित्र यांच्या अध्यक्षतेखाली व समाजातील व निमंत्रक प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत"ग्रंथालय संकल्प मेळावा व विद्यार्थी गुणगौरव समारंभ" उत्साहाच्या आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला.
प्रारंभी तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन झाल्यानंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली .या कार्यक्रम प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये P. S.I.-परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले "आयु.प्रज्ञावंत विद्यार्थी देशमुख ,ज्येष्ठ धम्म अभ्यासक आयु. विद्याधर देशमुख, त्याचबरोबर सम्यक विचार मंच कागलचे सन्माननीय संस्थापक , अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी प्रज्ञावंत विद्याधर देशमुख यांनी "विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी करावी तसेच महापुरुषांना आदर्श म्हणून आपला अभ्यास करावा म्हणजे यश आयुष्यामध्ये निश्चित मिळेल "असे सांगितले.यानंतर विद्याधर देशमुख यांनी "पालकांनी मुलांना घडवण्यासाठी लहानपणापासून त्यांच्यावर संस्कार करावेत.त्यांना चांगल्या सवयी लावाव्यात असे आवाहन केले."यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु.महादेव कांबळे यांनी" समाजामध्ये ग्रंथालयाची नितांत गरज असून ही गरज भागवण्यासाठी दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने भव्य दिव्य ग्रंथालय सर्वांच्या सहकार्याने उभारले जाईल यासाठी प्रयत्न करू असे." उपस्थितांना सांगितले.
याप्रसंगी "सम्यक विचार मंच कागल" यांच्यावतीने प्रस्तावित ग्रंथालयास "पाच हजार" रुपयांची पुस्तके दान देण्यात आली.तसेच येत्या काळात आणखी स्पर्धा परीक्षांची "पाच हजार" पुस्तके दान करण्याचे आश्वासन दिले .यानंतर आयु.गजानन कांबळे यांनी पाच हजार रुपये ची पुस्तके प्रधान साहेब यांनी पाच हजार रुपये त्याचबरोबर अन्य मंडळींनी होऊ घातलेल्या ग्रंथालयास भरघोस अशी आर्थिक मदत जाहीर केली. याप्रसंगी प्रज्ञावंत देशमुख यांनी यांचा सत्कार समस्त चिखली ग्रामस्थांच्या मार्फत करण्यात आला. तर कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा सत्कार आयु.महादेव कांबळे (माजी सैनिक वृक्षमित्र) यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच वाचन उपक्रम व लेखी परीक्षेमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.याप्रसंगी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वर्ग व समाज बांधव उपस्थित होते. शेवटी आभार गजानन कांबळे यांनी मानले.
------------------------------

