कोल्हापूर न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे दिनांक 17एप्रिल रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यातील वाठार, पेठवाडगाव, नृसिंहवाडी आणि जयसिंगपूर येथील नवीन बसस्थानाकांचे उदघाटन व लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते होणार आहे.
या दौऱ्यात कोल्हापूर बस स्थानकाची पण पहाणी करण्यात येणार आहे. कोल्हपूरच्या या बस स्थानकात येणाऱ्या जाणाऱ्या बस गाड्यांची संख्या खुप वाढली आहे. येथील अधिकारी, कर्मचारी तसेच प्रवासी यांचेशी चर्चा करून येथील स्थानका तील सुविधा व समस्या याबाबत ची माहिती घेतील असा अंदाज बांधला जातो. त्यांनी परिवहन मंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून एस टी महामंडळाच्या सेवा व सुधारणा कार्यात अमूलाग्र बदल होत आहेत.हजारो नवीन बसेस सेवेत दाखल होत आहेत. विदयार्थी, महिला, जेष्ठ नागरिक, दिव्यांग यांना मिळणाऱ्या सवलती यावर गड देखरेख ठेवण्यात येते.बस स्थानकांचे अत्याधुनिकरण करणे, हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वछता अभियान यावर त्यांनी विशेष भर दिला आहे.
परिवहन मत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी त्यांना या दौऱ्याचे औपचारिक आमंत्रण दिले आहे.या दौऱ्यात ते करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचे पण दर्शन घेणार आहेत. जिल्ह्याचे एस टी चे विभाग नियंत्रक अभय देशमुख हे मंत्री महोदयांचे स्वागत व दौऱ्याचे व्यवस्थापन करतील.
----------------------------

