नानीबाई चिखलीत शुक्रवारी मोफत आरोग्य शिबिर

Kolhapur news
By -

 

             


         कोल्हापूर न्यूज नेटवर्क


  नानीबाई चिखली,( ता.कागल )येथे शुक्रवारी (ता.१७) मोफत आरोग्य शिबिर होणार आहे. राजे बँक व राजे फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सहकारमहर्षी स्वर्गीय राजे विक्रमसिंह  घाटगे  यांच्या ७७व्या जयंती निमित्त या शिबिराचे आयोजन केले आहे.


 या शिबिरात हृदयविकार, अस्थि विकार, मूत्रविकार, नेत्र, जनरल, महिलांसाठी मोफत रक्त तपासणी करण्यात येणार आहे. रक्तदाब,ईसीजी, रक्तातील साखरेंची मोफत तपासणी केली जाणार आहे. तर एन्जिओग्राफी, टी एम टी टु डी ईको या तपासण्या सवलतीच्या दरात करण्यात येणार आहेत. तर या शिबिरात सिद्धिविनायक नर्सिंग होम, आकाशदीप नेत्रालय, मोरया हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्र नानीबाई चिखली, कोल्हापूर कॅन्सर सेंटर, संकल्प सिद्धी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, कोल्हापूर आर्थोपेडीक इन्स्टिट्यूटचे तज्ञ तपासणी करणार आहेत. कुमार विद्यामंदिर नानीबाई चिखली येथे सकाळी दहा ते दोन या दरम्यान शिबीर होणार आहे. या शिबिराचा इच्छूकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.


            -----------------------------