मुंबई : जिओ स्टुडिओज्' आणि 'मुंबई फिल्म कंपनी' यांच्या संयुक्त विद्यमाने साकार होणाऱ्या बहुप्रतिक्षित 'राजा शिवाजी' या ऐतिहासिक चित्रपटाचे पहिले गाणे, राजा शिवाजी अँथम 'छत्रपती', आज अधिकृतरीत्या प्रदर्शित झाले आहे. भारतीय इतिहासाचा तेजस्वी वारसा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अतुलनीय पराक्रम आणि हिंदवी स्वराज्याचा स्वाभिमान यांना समर्पित असलेले हे गीत म्हणजे केवळ संगीत नसून शौर्य आणि अभिमानाचा एक भव्य संगम आहे.
'देश म्युझिक' आणि 'वॉर्नर म्युझिक इंडिया'च्या माध्यमातून समोर आलेले हे गीत प्रेक्षकांना एका अद्वितीय आणि भावपूर्ण संगीतमय अनुभवाची प्रचिती करून देत असून, या गाण्याने शिवप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे.
---------------------------

