संत गोरोबाकाका यांचे अभंग जीवनाला दिशा देणारे - विजयसिंह रावसाहेब भोसले

Kolhapur news
By -

               


              कोल्हापूर न्यूज नेटवर्क


         नानीबाई चिखली येथे श्री संत गोरोबाकाका यांच्या पुण्यतिथी निमित्त  विजयसिंह रावसाहेब भोसले व कुंभार समाज बांधव  यांच्यावतीने अभिवादन करण्यात आले. 


  संत गोरोबाकाका यांच्या विषयी बोलताना विजयसिंह भोसले म्हणाले, संत गोरोबाकाका हे वारकरी संप्रदायातील एक महान संत होते.त्यांचा जन्म महाराष्ट्रातील तेर (जि. उस्मानाबाद) येथे झाला.ते व्यवसायाने कुंभार (माठ बनवणारे) होते, पण मनाने पूर्णपणे विठ्ठल भक्त होते.ते भगवान विठ्ठल यांचे अखंड नामस्मरण करत असत.त्यांचे अभंग साधे, पण जीवनाला दिशा देणारे होते.“काम करताना देखील देवाची आठवण ठेवावी” हा त्यांचा मुख्य संदेश होता. त्यांच्या जीवनातून आपल्याला प्रामाणिकपणा, साधेपणा आणि भक्तीभाव शिकायला मिळतो.


यावेळी सरपंच युवराज कुंभार, कृष्णा कुंभार (चेअरमन दत्तू कुंभकर सोसायटी चिखली) ,भाऊसो कुंभार, श्रीकांत कुंभार, मारुती कुंभार , रवी कुंभार , आरती कुंभार , भारत अरुण ,कुंभार बाळासो कुंभार , अनिल कुंभार , हरीश कुंभार , सुभाष कुंभार राहुल कुंभार , प्रथमेश कुंभार, श्रेयस कुंभार ,सचिन कुंभार बाळकृष्ण कुंभार आचारी यांच्यासह  कुंभार समाज  बांधव उपस्थित होते. 


          --------------------------------