मुरगुड मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नाका येथे महापूर सदृश्य परिस्थिती ; रस्त्याच्या आणि गटारीच्या अयोग्य कामाचा नागरिकांनी केला निषेध

Kolhapur news
By -

 

       


                    कोल्हापूर न्यूज नेटवर्क


         मुरगुड येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील इंडेन गॅस यांचे घर ते मुस्कान पेट्रोल पंप दरम्यानच्या रस्त्यावर तब्बल एक फुट पाणी साठले होते .तब्बल  तासाभराच्या  ढगफुटी सदृश्य पावसामुळे या रस्त्यावर एक तास पाणी साठल्यामुळे महापूर सारखी परिस्थिती निर्माण झाली होती . 


जितेंद्र सिंह ग्रुपने या रस्त्याचे काम निक्कृष्ट दर्जाचे केल्यामुळे तसेच बाजुस असणाऱ्या मोऱ्याचे काम देखील अयोग्य पद्धतीने झाल्यामुळेच या ठिकाणी पाणी साठल्याचा नागरिकांनी आरोप करून प्रशासनाचा निषेध केला. तब्बल एक फूट पाणी साठल्यामुळे नागरिकांची तसेच रक्षाबंधन सणासाठी येजा करणाऱ्याची मोठी गैरसोय निर्माण झाली होती गटारी मधून पाणी थेट रस्त्यावर आल्यामुळे क्षणभर महापूर आल्याचा भास निर्माण झाला होता यावेळी नागरिकांनी जितेंद्र सिंग ग्रुपच्या निषेधाच्या घोषणा दिल्या . यावेळी बोलताना प्रा.संभाजी आंगज यांनी हा रस्ता अयोग्य पद्धतीने बांधल्यामुळेच या ठिकाणी तसाभराच्या पावसामध्ये एक फूट पाणी साठल्याचा आरोप केला. या ठिकाणी असणाऱ्या मोऱ्या निकृष्ट दर्जाच्या असल्यामुळेच यातून पाणी बाहेर पडून थेट रस्त्यावर आल्यामुळे महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे असे त्यांनी सांगितले. 


   यावेळी शिवभक्त सर्जेराव भाट, समीर हळदकर, ओंकार पोतदार, मुरगुड नगरपालिका स्वच्छता मुकादम बबन बारदेस्कर,विशाल कापडे, आनंदा गोंधळी आदी नागरिक उपस्थित होते. वारंवार अशी परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे यावर कायमची उपाययोजना करावी अशी मागणी संतप्त नागरिकांच्या मधून झाली मधून पुढे आली आहे.