महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक डिसेंबरमध्ये ?

Kolhapur news
By -

 

        


            मुंबई :महाराष्ट्राचे मतदान डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीसोबत महाराष्ट्रातील निवडणुका होतील असे चिन्हे दिसू लागली आहेत. विधानसभेची मुदत संपल्यानंतर निवडणुका होणार असल्याने नोव्हेंबरमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे.


दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहिण योजनेचे आणखी 2 ते 3 हप्ते जास्तीत जास्त महिलांच्या खात्यावर जमा व्हावे, यातून महिलांचे मतदान आपल्याला व्हावे यासाठी निवडणूक लांबणीवर गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


राज्यातील अनेक महिलांनी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केले आहे. मात्र, त्यांचे अर्ज अजून स्वीकारले गेले नाहीतरी. तर ही योजना व्यापक करण्यासाठी नवे अर्जही भरून घेतले जात आहेत, पण किमान महिनाभर तरी हे अर्ज भरुन घेण्याचे काम पूर्ण होईल असे दिसत नाही . म्हणून अर्ज भरून घेण्यासाठी वेळ वाढवून दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत .