प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालयात पत्रकारांसाठी रक्षा बंधन कार्यक्रम संपन्न.

Kolhapur news
By -

 

                       


                  कोल्हापूर न्यूज नेटवर्क


          मुरगूड येथील प्रजापती ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालयामार्फत पत्रकार व समाजसेवक यांच्यासाठी रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

    ब्रम्हाकुमारी लताबहेन यांनी विश्वविद्यालयाची माहिती दिली. जगातील १४० देशातील विस्तार कार्य व युनो मार्फत मिळालेल्या शांतीदूत पुरस्काराबाबतही सांगितले.

    व्यकी व समाज यांना मन:शांतीची नितांत गरज आहे.नकारात्मक विचारांना दूर सारून सकारात्मक विचार रुजवणे हेच विद्यालयाचे उद्दिष्ट आहे.त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने दिवसातून किमान दहा ते वीस मिनटे ध्यान (Meditation) केले पाहिजे .

     सद्याची सामाजिक आणि राजकीय परिस्तिथी कशी अस्थिर बनली आहे हे सांगताना त्या म्हणाल्या की सर्पदंशाने एकाच व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो पण द्वेष व सूडभावना यांचे विष समाजात पसरले की अनेक जीव गमावले जातात.यासाठी  सकारात्मकता (positivity) महत्वाची आहे.

    पत्रकार व समाजसेवक यांचा गुलाब पुष्प व विद्यालयाचे घोषपत्र देऊन सत्कार करण्यात आला.लक्ष्मीबहेन यांनी नियोजन केले.पत्रकारांच्या वतीने माजी अध्यक्ष सुनील डेळेकर यांनी विद्यालयाचे आभार मानले.

   या वेळी ज्येष्ठ पत्रकार वि.रा.भोसले, शशी दरेकर,ओंकार पोतदार,विजय मोरबाळे ,राजू चव्हाण,शिवभक्त व समाजसेवक सर्जेराव भाट ,जगदीश गुरव, विक्रांत भोपळे,भाई संजय मगदूम,भिकाजी भांदीगरे,संभाजी पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.