अख्खा महाराष्ट्र बहिणीमय झालाय : उपमुख्यमंत्री अजित पवार

Kolhapur news
By -

 



पुणे :लाडकी बहीण योजनेमुळे अवघा महाराष्ट्र बहिणीमय झाला आहे. या योजनेंतर्गत पुढील 5 वर्षांत महिलांना 90 हजार रुपये मिळतील. पण त्यासाठी महायुती सरकारला पाठबळ द्यावे लागेल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी महिलांना आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन केले.  ते पुण्याच्या बालेवाडीत आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभावेळी बोलत होते.


अजित पवार म्हणाले की, महायुती सरकार पुढील 5 वर्षांत लाडक्या बहिणींना 90 हजार रुपयांची मदत करणार आहे. आपल्याला या योजनेचे सातत्य टिकवायचे आहे. त्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा 5 वर्षांची संधी मिळण्याची गरज आहे. आम्ही शब्दांचे पक्के आहोत. आम्ही वेळ मारून नेणाऱ्यांपैकी नाही. आम्ही जे बोलतो, ते करतो.