...तर पुतळा कोसळण्याची दुर्घटना टळली असती.

Kolhapur news
By -

 

            


                 

मुंबई :राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा  पुतळा कोसळला, त्या संदर्भात आता नवनवीन माहिती समोर येत आहेत. पुतळा उभारणीसाठी कला संचलनालयाची परवानगी आवश्यक असते. आता कला संचलनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे नेमकं सत्य काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे. "कुठली एजन्सी पुतळा उभारणीसाठी प्रस्ताव ठेवते, तेव्हा एजन्सीचा शिल्पकार क्ले मॉडेल तयार करतो. त्यावेळी आमच्यासमोर 6 फुटाच क्ले मॉडल सादर करण्यात आले होते. आम्ही मान्यता दिली, त्यावेळी पुतळा 35 फुटाचा असणार, त्यात स्टेलनेस स्टील वापरणार हे सांगितलं नव्हतं. आम्हाला माहिती दिली नव्हती" असा दावा कला संचलनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी केला आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. 


   कला संचालनालयाने राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याची उंची केवळ 6 फूट निश्चित केली होती, तर मग या पुतळ्याची उंची कशी वाढली? त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याविषयी मिश्रा  म्हणाले, ज्या एजन्सीकडून पुतळा उभारण्यात आला  त्यांनी शिल्पकाराला उंची वाढवण्याची सूचना केली असेल तर शिल्पकाराने त्यासंबंधीचा अभ्यास करण्याची गरज होती. कारण, एवढ्या मोठ्या उंचीचा पुतळा उभारण्यासाठी स्ट्रक्चरल इंजिनिअरची मदत घ्यावी लागते. तसेच त्या परिसरात पुतळा उभारताना कोणती तांत्रिक काळजी  घ्यावी लागेल हे ही पहावे लागते. कदाचित हा अभ्यास न केल्यामुळे ही दुर्घटना घडली असेल, ही काळजी घेतली असती तर ,पुतळा कोसळण्याची दुर्घटना टळली असती.