शिवराज विद्यालय मुरगुडचे माजी प्राचार्य प्रकाश दशरथ (पी.डी.) माने यांचे निधन

Kolhapur news
By -

 

            


                कोल्हापूर न्यूज नेटवर्क


       शिवराज विद्यालय मुरगुडचे माजी प्राचार्य प्रकाश दशरथ (पी.डी.) माने यांचे आज मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी सायं.5.10 वाजता कोल्हापुर येथे खाजगी दवाखान्यामध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.

       31 जून 2024 रोजी 39 वर्षाच्या दीर्घ सेवेतून प्राचार्य पदावरून ते सेवानिवृत्त झाले होते. अतिशय नम्र शिक्षक, हुशार व दर्जेदार प्राचार्य, सुंदर हस्ताक्षर असणारे कलाप्रेमी शिक्षक म्हणून त्यांचा लौकिक होता.