चिमुकल्यांनी पाद्यपूजा केली आणि आईबाबांनी अश्रूंना वाट करून दिली.

Kolhapur news
By -

 

            


                  कोल्हापूर न्यूज नेटवर्क

 

              ये तो सच हैं 

              की  भगवान हैं.

             हैं मगर फिर भी 

             अनजान हैं .

            धरतीपर रूप

              माँ बापका

          उसमे विधाता की

           पहचान हैं .


     आई आणि बाबा हेच धरित्री वरचे भगवान आहेत हे संस्कार चिमुकल्यांच्या वर बिंबवण्या करिता पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा एक मेळावा बोलावला.

    चिमुकल्यांनी पाद्यपूजा केली ,पायावर फुले वाहिली आणि आई बाबांनी अश्रूंना वाट करून दिली.

   हा भावोत्कट उपक्रम  मुरगुड मधील न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल ने आयोजित केला होता.

    पालक तर रोजच मुलांना भेटत असतात.त्यांच्याशी गप्पा मारतात,लाड करतात . चुकलेल्या पोरांना एखादा धपाटा लगावतात . पुन्हा जवळ घेतात .अशा भेटी शारीरिक असतात.

    पाद्यपुजा उपक्रमात मात्र आई बाबा मुलांना मनाने आणि हृदयाने भेटले.

     श्रावण बाळ ,पुंडलिक या महान भक्तांनी माता पित्यांच्या मध्येच ईश्वर पहिला होता.

     अनजान अशा ईश्वराची प्रचिती मुलांना माता पित्यां मध्ये करून देणे हे शालेय संस्काराचे उद्दिष्ट आहे.

    आईवडिलांना भारतात ठेऊन युरोप अमेरिकेत जाणाऱ्या मुलांच्या डोळ्यात अंजन घालणारा असा हा पाद्यपुजेचा कार्यक्रम शाळेने घेतला आहे असे उद्गार एका आईंने रडत काढले  . जन्म दात्या आईच्या अंतिम संस्काराला सुध्दा ही परदेशी मुले येऊ शकत नाहीत असे एका पित्याने सांगितले.

  वेदगंगेच्या पुरामुळे लांबलेला कार्यक्रम पूर पूर्ण ओसरल्यानंतर घेण्यात आला .दहा दिवस वेदगंगा वाटा अडवून बसली होती.तिला नमन करून पालक शाळेत आले आणि अश्रूंनी ओले झाले.

    प्राचार्या जस्मिन जमादार,सविता पोवार , ट्रिझा बारदेस्कर,गीता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा संपन्न झाला. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्व आयोजन केले .