स्वातंत्र्यदिनी सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय ; १०९ जणांचे रक्तदान

Kolhapur news
By -

 



                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या सर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत होते. तसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते. भारतात १४२ कोटी लोकसंख्या असूनही केवळ ७४ लाख ते १ कोटी २० लाख लिटर रक्त संकलित होते. म्हणूनच ७८ व्या  स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून  4 J R ह्युमन राईट्स आँरगेनायझेशनचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष  युवराज साळोखे यांच्या संपूर्ण परीवारातील साळोखे फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यास उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला व  १०९ रक्तदात्यांनी रक्तदान केले.  तसेच यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार व खेळात प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंचाही ही सत्कार करण्यात आला.