सामान्य शेतकरी कुटुंबातील दाेन सख्या बहिणींची पोलीस दलातील निवड अभिमानास्पद - आमदार विक्रम सावंत

Kolhapur news
By -

 

                   



                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


     प्रतिकूल आणि हालाखीच्या परिस्थितीवर मात करत महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सामान्य शेतकरी कुटुंबातील दोन सख्ख्या बहिणींची निवड होणे  अभिमानास्पद  आहे.  जत तालुक्यातील मुला-मुलींच्या साठी  प्रेरणादायी गोष्ट आहे असे प्रतिपादन आमदार विक्रम सावंत यांनी केले .

   

       जत तालुक्यातील लकडेवाडी येथील सुप्रिया रावसाहेब सकट आणि कोमल रावसाहेब सकट यांची अनुक्रमे मुंबई आणि कोल्हापूर पोलीस दलामध्ये निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते . 

  

      या कार्यक्रमासाठी सरपंच अशोक ऐवाळे,माजी सरपंच एकनाथ बंडगर  व महादेव बंडगर , सर्व सहकारी सोसायटी सोन्याळचे  चेअरमन भाऊसाहेब कटरे ,माजी व्हाईस चेअरमन लकडे यांच्यासह इतर उपस्थित होते . 


ज्येष्ठ नागरिक भाऊ एरंडे यांच्या हस्ते आमदार विक्रम सावंत यांचा यावेळी सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर शेंडगे यांनी केले .