केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणणार - पालकमंत्री हसन मुश्रीफ

Kolhapur news
By -

 


         


                काेल्हापूर न्यूज नेटवर्क


      आगीमुळे नुकसान झालेले  केशवराव भोसले नाट्यगृह ही  ऐतिहासिक वारसा असलेली वस्तू आहे .त्यामुळे या ठिकाणी पूर्वी होते तसेच नाट्यगृह उभारावे, अशी समस्त कोल्हापूरकरांची भावना आहे, त्यासाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी  आणण्यासाठी  पालकमंत्री म्हणुन कटिबध्द आहे  असे आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले .


     

  खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या पुढाकाराने केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्निर्माणाकरिता शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते. 


या बैठकीस माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, आमदार जयश्री जाधव वहिनी, आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील जी, शिवसेनेचे उपनेते संजय पवार जी, राहुल पी.एन. पाटील, ऍड. महादेवराव आडगुळे, वसंतराव मुळीक, सचिन चव्हाण, आर. के.  पोवार, सुरेंद्र जैन, अभिनेते आनंद काळे, मिलिंद अष्टेकर, आर्किटेक्ट अजय कोराणे, विजय कोराणे, हर्षल सुर्वे, सतीशचंद्र कांबळे, अशोक पोवार, अनिल घाटगे यांच्यासह कलाकार, तंत्रज्ञ, आर्किटेक्टस, उद्योजक व कोल्हापूरकर उपस्थित होते.