मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत तिसरी आघाडी करणार - संभाजीराजे छत्रपती

Kolhapur news
By -

 

           


               कोल्हापूर न्यूज नेटवर्क

   

संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य पक्षाच्या वतीने देखील विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. आपण मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत तिसरी आघाडी करणार असल्याची माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत लवकरच बोलणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


विधानसभा निवडणूक एकत्र लढवण्याबाबत आपली आणि मनोज जरांगे पाटील यांची अद्याप चर्चा झालेली नाही. मात्र, या संदर्भात आपण लवकरच चर्चा करणार असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले आहे. समाजामध्ये काम करत असताना मनोज जरांगे पाटील यांचे उद्दिष्ट आणि माझा उद्देश एकच आहे. त्यामुळे आम्ही एकत्र येऊन काम करणार असल्याचा देखील विश्वास संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला आहे.


पुणे जिल्ह्यातून अहमदनगर जिल्ह्याकडे जात असताना मनोज जरांगे पाटील यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचे संकेत मनोज जरांगे पाटील यांनी दिले होते. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, कागदपत्रे जमा करा, असे आवाहन देखील मराठा समाजातील इच्छुक उमेदवारांना केले होते. त्यात आता संभाजीराजे छत्रपती यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.