वसई : बदलापूर मधील अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे . सर्वत्र निषेध आंदोलन करण्यात आली. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी देखील केली जात आहे. अशातच आता वसई येथून आणखी एका शाळेतून लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. वसईमधील नायगाव येथील शाळेमध्ये 7 वर्षांच्या चिमुकलीवर 4 ते 5 वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर नायगाव पोलिसांनी प्रत्येक शाळेत 'गुड टच आणि बॅड टच' अनुषंगाने शिबीर घेतले. त्यानंतर पीडित मुलीने आपल्या शिक्षीकेला ही घटना सांगितली. त्यानंतर पोलिसांना ही बाब सांगण्यात आल्यावर नायगाव पोलिस ठाण्यात विनयभंग, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून, अल्पवयीन मुलाला अटक करून, रिमांड होम मध्ये रवाना केले आहे .

