कोल्हापूर न्यूज नेटवर्क
"प्रत्येकाने आपल्यातले वेगळेपण शोधावे म्हणजे जीवन सुंदर आहे याचा अर्थ कळेल", आपली आवड निवड संकल्पना आणि आपल्या उद्दिष्टेयापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण निवडलेले करिअर डोळ्यासमोर ठेवून उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्न करावेत. आपल्या शिक्षणाचा कौशल्याचा उपयोग नोकरी शोधण्यात घालवण्यापेक्षा नाविन्यपूर्ण उद्योग व्यवसाय सुरू करून उद्योगांना पुढे नेण्यासाठी प्रयत्न करा त्यात स्वतःचे आणि देशाचे हित आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. तंत्रज्ञान बदलत चालले आहे त्यासोबत आपणही वेळोवेळी बदलणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले .
संजय घोडावत इन्स्टिट्युटच्या प्रांगणात १२व्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त, विनायक भोसले, इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर, डॉ. विराट व्ही. गिरी, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक, कर्मचारी, पालक विद्यार्थी उपस्थित होते.
उपस्थितांना हसता हसता त्यांच्या डोळ्यात कधी पाणी आले ते कळलेच नाही. त्यांच्या सोशल मीडियावर गाजत असलेल्या कविता ‘राणी गाव सुटेना’ या कवितेवर सर्वांनी ठेका धरला होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डायरेक्टर, डॉ. विराट गिरी यांनी केले. संजय घोडावत पॉलीटेक्निक ते इन्स्टिट्यूट या संस्थेचा १२ वर्षाचा प्रवास वर्णन व्यक्त्त केले. संस्थेचे चेअरमन संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहाय्य करणाऱ्या सर्वांचे मनपासून आभार व्यक्त करून विद्यार्थ्यांनी मिळवलेले वेगवेगळ्या क्षेत्रातील सक्सेस, पालकांचे सहकार्य, संस्थेच्या गुणवत्तेची दखल घेऊन संस्थेला मिळालेले विविध पुरस्कार, उच्च शिक्षणातील गुणवत्ता आणि दर्जावाढीसाठी ‘एनबीए’ मूल्यांकन प्राप्त सर्व विभाग, उत्कृष्ट, दर्जेदार शिक्षण आणि जागतिक दर्जाच्या संकुलनात उपलब्ध असलेले अभ्यासक्रम विषयी माहिती देवून सर्वाना १२ व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

