बिद्री साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन गणपतराव फराकटे यांचे निधन

Kolhapur news
By -

 

              


           बिद्री सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन गणपतराव फराकटे यांचे शनिवारी, (२४ ऑगस्ट) सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास निधन झाले. गेले काही दिवस त्यांची प्रकृती ठीक नव्हती. कोल्हापुरात खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. तात्या या नावांनी ते परिचित होते.


ते राजकीय, सहकार क्षेत्रात कार्यरत होते. कागलच्या राजकारणातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. बोरवडे ग्रामपंचायतीचे सरपंचपदही त्यांनी भूषविले होते. कागल पंचायत समितीचे माजी उपसभापती म्हणून काम केले आहे. त्यांचा बिद्री परिसरात आदरयुक्त दबदबा होता. बिद्री साखर कारखान्यात पंचवीस वर्षाहून अधिक काळ त्यांनी संचालक म्हणून प्रतिनिधीत्व केले. संचालक, व्हाईस चेअरमनपद भूषविले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोज फराकटे यांचे ते वडील होतं. माजी आमदार के. पी. पाटील यांचे ते व्याही होत.