विद्यार्थ्यांनी तयार केल्या मातीच्या गणेश मूर्ती ; न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलचा पर्यावरण पूरक उपक्रम

Kolhapur news
By -

     


               कोल्हापूर न्यूज नेटवर्क


    गणेशोत्सव तोंडावर आहे.अनेक सामाजिक संस्था व पर्यावरण विभागाकडून गणेश भक्तांना व गणेश मंडळांना पर्यावरण पूरक मूर्तींचा आग्रह धरा असे आवाहन करण्यात येत आहे.

     पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन मुरगूड येथील न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल च्या पाचवी ते सातवीच्या विद्यार्थांनी क्राफ्ट शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मातीच्या सुबक गणेश मूर्ती तयार केल्या .  पालकांना व गणेश भक्तांना तसे आवाहन करणारे कांहीं संदेश सुध्दा त्यांनी प्रसारीत केले.

    चिमुकल्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

   क्राफ्ट शिक्षक मीना फर्नांडिस,कोमल मगदूम व सुतार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.