लांडगा आलारे ... कागलच्या राजकारणाचे विदारक चित्र

Kolhapur news
By -

 

           


काेल्हापूर न्यूज  / जेष्ठ पञकार वि. रा. भाेसले


 कागल विधानसभा मतदार संघाचे राजकारण कधी नव्हे इतकं तापले आहे.निवडणुका दिवाळी नंतर होतील.फटाके मात्र आतापासूनच फुटू लागले आहेत.

   हे फटाके उमेदवार आणि त्यांच्या पाठीराख्यांनी फोडायला सुरुवात केली आहे.

    शरद पवार कागलात येऊन गेले. गैबी चौकात काय बोलायचे ते ठरवून आले होते.

     "गद्दाराना त्यांची जागा दाखवा " म्हणाले

   

 काही दिवसापूर्वी "पवार एक्के पवार "

असे म्हणणाऱ्या मुश्रीफ यांना तो टोला होता.

    

 समरजित घाटगे यांनी गैबी चौकात म्हंटले,ही निवडणूक लोकांनीच हाती घेतली आहे.लोकसेवक म्हणून मला निवडून द्या.

    गर्दीचा उच्चांक मोडल्याचे पण त्यांनी सांगितले.

    हसन मुश्रीफ हे सुध्दा मुरलेले नेते आहेत. 


"पवार साहब से बैर नाही, समरजित तुम्हारी खैर नही" 


     शब्दांची ही आतषबाजी पाहिली की उत्तर प्रदेशात लांडग्याच्या संकटावर मात करण्यासाठी जी मोहीम सुरू आहे त्याची आठवण येते.

    लांडगा म्हणजे हिंदीत भेडीया.या भेडीयाना मानवी रक्ताची चटक लागल्याने ते छोट्या वस्त्यांवर हल्ले करू लागले आहेत.कित्येक मुले दगावली आहेत.त्यामुळे तिथले सामाजिक वातावरण  भीतीदायक झालं आहे.

    महाराष्ट्राचे राजकारण सुध्दा त्याच वळणावर आले आहे.

  

 लांडगा आलारे आला असे म्हणून एकमेकांना भीती दाखवणे सुरू आहे.

  

   शरद पवार यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री चेहेरा निवडणुकीनंतरच जाहीर करू असे स्पष्ट सांगितले .त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या चेहऱ्यावरचे भावच बदलून गेले.त्यांचा आवेश ओसरला.आदित्य गप्प झाला.

   लांडगा आलारे ...

म्हणतात ते यालाच.

   टीव्ही वर रोज अर्थ शून्य बडबड करणाऱ्या संजय राऊत यांची टिमकी सुध्दा थांबली.नाना पटोलेंनी सुध्दा उबाठाच्या मागे लांडगा सोडून दिला.

    अगदी तीच स्थिती कागलच्या राजकारणात सुरू झाली आहे.

    समरजितसिंह घाटगे यांनी दोन दशकांहून अधिक आमदारकी आणि मंत्री पदे भूषविणाऱ्या हसन मुश्रीफ यांना एक प्रकारे अशीच भीती दाखवली .

  लांडगा आला रे आला...

मुश्रीफ यांनी

" तुमची कांहीं खैर नाही"


 म्हणून प्रतिक्रिया दिली.

     एवढ्यावर हे थांबलं नाही.खासदार श्रीकांत शिंदे यांचा समन्वय दौरा कोल्हापुरात झाला .

 'मिसळ पे चर्चा ' करून हात पुसून ते जायच्या तयारीत असतानाच कागल मधील ही जुगलबंदी त्यांच्या कानी आली.

   गर्दीत एक अर्ज पुढे आला. माजी खासदार संजय मंडलिक यांचे चिरंजीव विरेंद्र मंडलिक यांनाच महायुतीतुन कागलची उमेदवारी द्यावी.

  त्यामुळे दोघेही धास्तावून गेले असावेत.

मंडलिक गटाच्या पाठिंब्यासाठी दोघांचे प्रयत्न सुरू आहेत.

  पुनः भिती 

लांडगा आला रे......

   तिकडे गडहिंग्लज मध्ये स्वाती कोरी गोफण घेऊन बसल्या आहेत.जातीयवादी घटकाशी तडजोड नाही म्हणत एका विशीष्ठ वर्गाला खुश करण्याचा प्रयत्न.

   बाभुळकर यांचा कागल शी कांहीं संबंध नाही पण त्याही शरद पवारांच्या स्टेज वर दिसल्या.

   स्व.सदाशिवराव मंडलिक ,बाबा कुपेकर यांच्या आमदारकीची पण चर्चा झाली.

  हसन मुश्रीफ यांना शह देण्याची एकही संधी शरद पवारांनी सोडली नाही.

  समरजित यांना ताकद देण्या पेक्षा हसन मुश्रीफ यांना कशी मात देता येईल यात त्यांना अधिक रस दिसला.

   हे सर्व राजकारण उत्तर प्रदेशातील बहुचर्चित  भेडीया मोहीमे सारखे वाटले.

 मराठीत म्हण आहे.

लांडगा आलारे....

  अगदी तसं.

--------------------------------------------------