मनोज जरांगे आणि मंत्री अब्दुल सत्तार भेटूीतून कटूता झाली कमी ; फडणवीस -मनोज जरांगे यांच्यात फोनवरून झाली चर्चा ; मराठा आरक्षणाच्या आशा पल्लवीत

Kolhapur news
By -

 

        


जालना :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची रात्री उशिरा भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाली. यांच्या चर्चेदरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही फोनवर चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांना भेटल्यानंतर आता अब्दुल सत्तार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेणार असल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जरांगे पाटील विरुद्ध सरकार वादामध्ये तोडगा निघतो का, याकडे आता लक्ष लागले आहे.


लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी महायुतीला राज्यात मोठ्या प्रमाणात पराभव सहन करावा लागला होता. राज्यातील अनेक मतदारसंघावर मराठा आंदोलनाचा परिणाम झाल्याचे या माध्यमातून दिसून आले. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा आंदोलकांचा रोष कमी करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले असून ही भेट त्याचाच एक भाग असल्याचे सांगितले जाते.