कोल्हापूर न्यूज नेटवर्क
शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर संचलित मुरगूड हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय मुरगूड येथे नुकतिच 'महाराष्ट्रीय ज्वेलरी मेकिंग' या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली.
श्रीमती सुशिलादेवी मल्हारराव देसाई युवती सचेतना फाउंडेशन यांच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला. खास करून युवती आणि शालेय विद्यार्थ्यांनी यांच्यासाठी असलेल्या या उपक्रमात महाराष्ट्रीयन ज्वेलरी मेकिंग या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.सुरुवातीला श्रीमती देसाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर मार्गदर्शिका सौ. अमृता जाधव यांचे स्वागत प्रा.सौ.जयश्री पवार भोसले यांनी तसेच गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज च्या समन्वयक प्रा. सौ आर. एम. पाटील यांचे स्वागत प्रा. सौ. टी. एस. पाटील यांनी पुषगुच्छ देऊन केले कार्यशाळेत महाराष्ट्रीय पद्धतीचे बुगडी, नथ, नोझपीन, हे दागिणे, तसेच मोत्यांचे विविध प्रकारचे दागिने, इमिटेशन वगैरे कसे केले जाते हे प्रत्यक्षिकासह दाखवले. यात कांही युवती व विदयार्थीनी सुद्धा सहभागी झाल्या.या प्रेरणादायक उपक्रमातून युवतींच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण झाला.
सूत्रसंचालन प्रा.सौ. बी वाय. मुसाई यांनी केले. आभार प्रा. सौ. एस. एस. पाटील यांनी मानले. कार्यशाळेस मोठया प्रमाणात युवती व विदयार्थीनी उपस्थित होत्या.
-------------------------




