कोल्हापूर न्यूज नेटवर्क
गारगोटी आगाराने मुरगूड आदमापुर ते ठाणे अशी बस सेवा दिनांक 22 एप्रिल 2026 पासून सुरू केलेली आहे.
ही बस गारगोटी होऊन सकाळी आठ वाजता सुटेल व मुरगूड ला येईल. मुरगूड होऊन 8 45 ला हे बस सुटेल व आदमापूर, बिद्री कोल्हापूर व त्यातून कराड, सातारा पनवेल,वाशी, ऐरोली मार्गे ठाणे.
ठाणे येथील वंदना बस स्थानकावर ते 5.40 ला पोचेल.
मुरगूड येथे या बसचे पूजन स्नेहा काशीद वाहक, राधानगऱी व बस प्रवासी आदेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीफळ व पुष्पहार अर्पण झाल्यावर बस मार्गस्थ करण्यात आली.
ठाण्याहून ही बस सकाळी 8 वाजता निघेल व मुरगूड येथे 17.55ला पोचेल.
बसच्या पूजन व उदघाट्न सोहळ्यास पुढील प्रमाणे उपस्थिती होती.
वाहतूक नियंत्रक संजय भोसले व बाळासो परीट. याशिवाय स्थानकावरील सर्व चालक, वाहक, कर्मचाऱी, प्रवासी इत्यादी.
या बस सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा गारगोटी आगार प्रमुख अविनाश चौगुले यांनी व्यक्त केली.
-----------------

