वस्ताद...डाव...आणि हादरे

Kolhapur news
By -

               


    शरद पवार साहेब हे वस्तादांचे वस्ताद आहेत. शेवटचा एक डाव त्यांनी राखून ठेवलेला असतो, हे मी जाणाऱ्या आमच्या मित्रांना सांगत होतो. जाऊ नका, मोठं लफडं होईल असे ही मी सांगत होतो, काही करा पण त्या नेत्याला म्हणजे शरद पवारांना अंगावर घेण्याचं धाडस करू नका, कपाळमोक्ष ठरलेला आहे. तुम्ही पवारसाहेबांच्या वाटेला जाऊ नका असे कागलच्या ३  सप्टेंबरच्या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले होते. 


जयंत पाटील यांच्या बोलण्याचा प्रत्यय यायला सुरुवात झाली आहे .अजितदादा पवार गटाचे कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम वस्तदांच्या डावामुळे अस्वस्थ झाले आहेत. त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम  शरद पवार  यांच्या पक्षाच्या फक्त संपर्कात असल्याने व  वस्तादांनी  अजून अधिकृत डाव ही टाकला नसल्याने सुद्धा  धर्मरावबाबा आत्राम यांचा संयम सुटलेला आहे, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून जावायाला ते नदीत टाकण्याची भाषा करू लागले आहेत. त्यामुळे वस्तादांच्या डावांचे हादरे बसण्यास सुरू झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे . 

-------------------------------------------